विनाअभ्यास बुलेट ट्रेन? मुंबई-अहमदाबाद मार्गावर 40 टक्के सीट्स रिकामी

विनाअभ्यास बुलेट ट्रेन? मुंबई-अहमदाबाद मार्गावर 40 टक्के सीट्स रिकामी

मुंबई | मुंबई ते अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. मात्र ही ट्रेन सुरु करण्यापूर्वी मोदी सरकारने या मार्गाचा अभ्यास केलेला नाही, असं दिसतंय. 

मुंबई ते अहमदाबाद धावणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या गाड्यांची 40 ते 44 टक्के सीट्स रिकामी असतात, अशी माहिती समोर आलीय. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना पश्चिम रेल्वेने ही माहिती दिलीय. 

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 3 महिन्यांमध्ये या मार्गावर पश्चिम रेल्वेला तब्बल 30 कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावं लागलंय.

Google+ Linkedin