बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

SIT चौकशी दरम्यान किरण गोसावी संबंधी धक्कादायक माहिती आली समोर!

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत अनेक खळबळजनक खुलासे आणि गौप्यस्फोट करण्यात आले. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पंच प्रभाकर साईलने एनसीबी अधिकाऱ्यांसह वैयक्तिक पंचांवर वसुलीचा गंभीर आरोप केला. प्रभाकर साईलने लावलेल्या या आरोपाचा तपास मुंबई पोलीसांच्या एसआयटीकडून केला जात आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक महत्वाच्या गोष्टी एसआयटीकडून उघड करण्यात आल्या. तर या तपासादरम्यान किरण गोसावी संबंधी धक्कादायक माहिती एसआयटीच्या निदर्शनास आली आहे. या क्रुझ कारवाई दरम्यान किरण गोसावीने स्वत:ला एनसीबी अधिकारी भासवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

किरण गोसावीनं स्वत:ला एनसीबी अधिकारी असल्याचं भासवलं आणि यामागचा हेतू हा केवळ अभिनेता शाहरूख खानची मॅनेजर पुजा ददलानी हीचा विश्वास संपदान करणं होता. पुजा ददलानीचा विश्वास संपादन करून याबदल्यात आर्यन खानला सोडायचं आणि पैसे उकळण्याचा कट असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिस किरण गोसावीच्या अटकेच्या तयारीत आहेत. पण यासाठी पुजा ददलानं तक्रार करणं गरजेचं आहे. मुंबई पोलिसांनी पुजा ददलानीला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले पण तब्येतीचं कारण देत पुजा ददलानीने पोलीसांकडे वेळ मागितला आहे. याप्रकरणी किरण गोसावीला अटक झाली तर प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे”

“पोलिसांना कलेक्शनसाठी वापरता मग ड्रग्ज रोखण्यासाठी का वापरत नाहीत?”

“पडळकरांच्या जिवाला काही झाल्यास राष्ट्रवादीचे नेते जबाबदार असतील”

“तेच मी माझ्या बंधूंना गेली कित्येक दिवस सांगतोय की…”

“एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा अन्यथा…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More