पुणे महाराष्ट्र

पुण्यात कचरा मुक्त शहरासाठी पालिकेचा प्रस्ताव

पुणे | स्वच्छ सर्वेक्षण 20-20 अंतर्गत पिंपरी-चिंचवडला पाच तारांकित नामांकन कचरा मुक्त शहर घोषित करण्याची मागणी राज्य सरकारकडं करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

महाराष्ट्र अभियान नागरी कचरामुक्त शहरांना तारांकित मानांकन देण्याच्या सूचना राज्याच्या नगरविकास विभागाने दिल्या आहेत. या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात मिशन मोड पद्धतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहीमे अंतर्गत राज्यातील सर्व शहरं हगणदारीमुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे या दोन मुख्य बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

वास्तविक, स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ची अंमलबजावणी करीत आहे. त्या अनुषंगाने शहराची कचरामुक्त शहर स्टार रेटिंग जाहीर करणं आवश्यक आहे.

पाच तारांकित मानांकनासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यापूर्वी शहराला तसं स्वयंघोषित करावं लागणार आहे. त्याला अनुसरून पालिका प्रशासनानं तयार केलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या