बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर!

पुणे | पुण्यातील उरूळी कांचन येथील गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले होते. नेमकी कोणत्या कारणावरून हत्या झाली हे तेव्हा समजलं नव्हतं मात्र पोलिसांंनी या हत्येचा उलगडा केला आहे. गारवा हॉटेलचs मालक रामदास आखाडे यांची हत्या ही त्यांच्या हॉटेलच्या प्रसिद्धीमुळेच झाली.

गारवा हॉटेल हे मटन बिर्याणीसाठी खूप प्रसिद्धआहे. येथे लोक खूप दूरवरून येतात त्यामुळे या हॉटेलचा दिवसाचा गल्ला हा जवळजवळ दोन लाख रूपये होत असल्याची माहिती आहे. मात्र या हॉटेलमुळे त्यांच्या जवळील अशोका हॉटेल हे चालत नसायचे. या हॉटेलचे मालक बाळासाहेब खेडेकर यांनी गारवा हॉटेलबाबत अनेक अफवा पसरवल्या कारण ज्यावेळी गारवा हॉटेल बंद असायचं त्यावेळी खेडेकरांच्या हॉटेलचा गल्ला चांगला जमायचा. म्हणून त्यांनी अफवा पसरवल्या मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

त्यानंतर त्यांनी गारवा हॉटेलच्या मालकाचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी आरोपी खेडेकर यांनी भाचा सौरभ चौधरीला दिवसाला दोन-तीन हजार देत जाईल असं अमिष दाखवलं. या अमिषाला सौरभ भुलला आणि त्याने आपल्या सराईत गुन्हेगारांना आखाडेंच्या खुनाची सुपारी दिली. 17 जुलैला रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास रामदास हाॅटेल बाहेर खुर्चीवर फोनवर बोलत होते. एवढ्यातच आरोपी रामा आवताडे चालत त्यांच्या जवळ आला आणि क्षणात टी-शर्ट खाली लपवलेली तलवार काढून रामदास यांच्यावर सपासप वार करु लागली. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले.

दरम्यान, बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जहांगीर रुग्णालयात रामदास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणात छडा लावला. अशोका हॉटेलचे मालक, त्यांचा मुलगा आणि एकूण 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या महिलेने खुनात वापरलेली तलवार आपल्या घरात ठेवली होती.

थोडक्यात बातम्या-

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले

“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

‘चंद्रशेखर बावनकुळे सरकार पाडण्यासाठी झारखंडला गेले होते’; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपावर बावनकुळेंनी सोडलं मौन,म्हणाले…

महत्त्वाची बातमी! राज्यातील 25 जिल्हयांमध्ये निर्बंध शिथिल तर या 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More