बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘म्युझिकल थेरेपी’! व्यायाम करुन घेण्यासाठी नर्सनं लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोना महामारीचं सावट काही संपायचं नाव घेईना. यातच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटनं नागरिकांना हैराण करुन सोडलं आहे. अशातच सगळीकडे चिंतेचं वातावरण असताना काही डाॅक्टर, नर्स, रुग्णावर उपचारासाठी लागेल ती मेहनत घेत असल्याचं पहायला मिळत आहे.

एक नर्स रुग्णाला उपचार देत असल्याचा हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रुग्णाला अर्धांगवायू झाला आहे. त्या रुग्णाकडून व्यायाम करुन घेण्यासाठी एक नर्स मेहनत घेत आहे. रुग्णाकडून व्यायाम करुन घेण्यासाठी नर्स गाण्यावर डान्स स्टेप करत आहे आणि त्या रुग्णाकडूनही ते करुन घेत आहे.

नर्स आणि रुग्णांचा हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहे. अनेकांनी त्या नर्सचं कौतुक केल्याचं पहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ शेअरही करण्यात येत आहे.

दरम्यान, व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

पुष्पाची क्रेझ संपता संपेना! आता ब्रावोनं केला भर मैदानात ‘पुष्पा’वर हटके डान्स, पाहा व्हिडीओ

Whasapp New Feature: व्हाॅट्सअॅपचं ‘हे’ नवं फीचर लवकरच होणार लाॅंच

मोठी बातमी! संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना मोठा झटका

“‘टिपू सुलतान’ नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे”

‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही’; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More