बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं”

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून हल्लाबोल करत भाजप सत्तेत आल्यापासून वंचित, दलित आणि शोषितांवरील अत्याचारात वाढ झाल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर देशात होणाऱ्या खासगीकरणाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देश चालतो. पण भाजप सरकार संविधान बदलण्याचं काम करत आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे.

‘केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून दलितांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले, या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम करण्याचं पाप केलं, आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हे प्रयत्न करत आहेत, यांना यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे’, असं म्हणत नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे.

गुरूवारी टिळक भवन येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात पटोलेंनी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाबासाहेबांच्या विचारांना टिकवलं तरच हा देश टिकेल, असं म्हणत नाना पटोलेंनी काँग्रेस आणि आंबेडकरी विचार तळागाळापर्यंत पोहोचवून परिवर्तन घडवून आणण्यासाठी जोमाने काम करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.

दरम्यान, नाना पटोलेंच्या केेंद्रातील भाजप सरकारवरच्या हल्ल्याला आता भाजपकडून प्रत्युत्तर मिळणार का?, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पटोलेंच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात मात्र नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या

फोन टॅपिंग प्रकरणातील ‘तो’ गोपनीय अहवाल फडणवीसांनी नाही तर या नेत्यांनी उघड केला

ख्रिस्तियानो रोनाल्डो आता होणार 6 मुलांचा बाबा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली बातमी

मुलाच्या सुटकेनंतर शाहरुखचा पहिला फोटो आला समोर

सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! फेसबुकचं नाव बदललं

“शिवसेनेचं हिंदुत्व नितेश राणेंच्या जन्माच्या अगोदरपासून, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More