बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशाला बरबाद करणाऱ्यांना केंद्रिय मंत्रिमंडळात ठेवलं आहे”

मुंबई | काल केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे तर काही नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देखील मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेला राजीनाम्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी स्वतः नरेंद्र मोदींनी चा राजीनामा द्यायला हवा होता, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेस पक्ष 10 दिवस केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणार आहे.

या आंदोलनादरम्यान आज आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात नागपूर येथे सायकल रॅली काढण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळात चांगलं काम करणाऱ्यांना काढण्यात आलं असून देशाला बरबाद करणार यांना मंत्रिमंडळात ठेवला आहे असा घणाघात नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाकाळामध्ये गंभीर परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी स्वतः पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच मंत्रिमंडळात कोणालाही भेटलं तरी सर्व कारभार हा पंतप्रधान कार्यालयातून चालणार असल्याने त्याने काही फरक पडत नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

 

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More