बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंजा फक्त टायगर जवळच असतो आणि टायगर काँग्रेसमय झालाय”

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन इथं राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचं काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आलं. यावेळी बंजारा टायगर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना नाना पटोले भाजपवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता आल्यानंतर बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षण देतो, असं लेखी आश्वासन दिलं होतं. पण आजपर्यंत त्यांनी तो शब्द पाळला नाही. बंजारा समाजाची फसवणूक करून समाजाच्या दैवतांचा मोदींनी घोर अपमान केला आहे, अशी टीका पटोलेंनी केली आहे.

बंजारा टायगर फोर्सच्या काँग्रेस पक्षातील विलीनीकरणामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. भाजपचा खरा चेहरा आता बंजारा समाजासमोर आला असून बंजारा समाज भाजपला थारा देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले. भाजपने धनगर, मराठा समाजाची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक बंजारा समाजाचीही केली आहे, असा आरोप पटोलेंनी भाजपवर केला.

बंजारा समाजाने राज्याला दिशा दाखवून दिली. बंजारा समाज हा आत्मसन्मासाठी लढणारा, देशहितासाठी काम करणारा समाज आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस पक्षात विलीन झाली. टायगरला इलाका नसतो आणि पंजा फक्त टायगरकडे असतो आणि आता टायगर काँग्रेसमय झाला आहे, असा मिश्किल टोला पटोले यांनी लगावला.

थोडक्यात बातम्या- 

वाह! घरगुती गॅस सिलेंडरवर 900 रुपयांचा कॅशबॅक; ‘ही’ आहे भन्नाट ऑफर!

वारकऱ्यांनो आळंदीच्या वारीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा- बंडातात्या कराडकर

…म्हणून ट्विटरवर चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

औरंगाबादमधील ‘या’ आमदाराने भर चौकात केली बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण; पाहा व्हिडीओ

‘लस घ्यायला आली की फोटोशुटसाठी?’; लसीकरणासाठी आलेली मलायका झाली ट्रोल, पाहा व्हिडीओ

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More