बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील तरुणांना राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा- नाना पटोले

मुंबई | गेल्या सात वर्षापासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार असून ते मनमानी पद्धतीने काम करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लोकांच्या हितासाठी अनेकदा सूचना केल्या. त्या सूचना किती हीतकारक होत्या, त्याची जाणीव आता होत असल्याचं  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांनी म्हटलं आहे.

देशातील तरूणवर्गही राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचं पाहू इच्छित आहे. देशाला दूरदृष्टी असलेला आणि सर्व घटकांना सोबत घेऊन जाणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेतृत्त्वाची गरज असल्याचं नाना पटोले म्हणाले. राहुल गाधींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत. त्यांच्या या संघर्षाला ताकद देऊन महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा आपला संकल्प आहे. नोटबंदी, जीएसटी, कोरोनाचे संकट यावर त्यांनी विधायक सूचना केल्या, पण त्याकडे मोदी सरकारने लक्ष दिलं नाही. त्याचा परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत असल्याचं नाना पटोेले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना संकट मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे हातळल्याने देश 20 वर्ष मागे गेला. सामान्य लोकांचे संसार उघड्यावर आणलं. डॉ. मनमोहनसिंह, राहुल गांधी यांनी केलेल्या सूचनांचा विचार न केल्यामुळे देशाला मृत्यूच्या खाईत लोटलं असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या- 

‘गाडीत असताना उद्घाटन न करताच निघून जावं वाटलं पण…’ अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

मुंबईत दररोज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय घट, कोरोनामुक्तीचा दर वाढला

लाॅकडाऊन उघडताना काळजी घ्या; केंद्राची राज्यांना ‘ही’ महत्वाची सूचना

‘अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही’; दादरच्या राड्यावर ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More