नांदेडमध्ये झाडावर वीज पडून ५ महिलांचा मृत्यू

नांदेड | नांदेडमध्ये वीज पडून ५ महिलांचा मृत्यू झालाय. उमरी तालुक्यातील कारला माळ परिसरात ही धक्कादायक घटना घडलीय. रेखा पवळे, शोभा पवळे, शोभा जाधव, मोहनाबाई सोनवणे आणि शेषाबाई गंगावने अशी मृत महिलांची नावं आहेत.

पाचही महिला शेतात कामासाठी गेल्या होत्या. मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने त्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला. या झाडावर वीज कोसळल्याने या महिलांचा जागीच मृत्यू झाला.