…अन् ‘स्वाभिमान’चे नेते नारायण राणे भाजपच्या निवडणूक जाहिरनामा बैठकीला हजर!

नवी दिल्ली |  काही दिवसांपूर्वीच ‘स्वाभिमान’ पक्षाचे नेते नारायण राणेंना भाजपने निवडणूक जाहिरनामा समितीमध्ये स्थान दिलं होतं. काल नवी दिल्ली येथे झालेल्या भाजपच्या निवडणूक जाहिरनामा समितीच्या बैठकीला नारायण राणेंनी हजेरी लावली.

भाजपचे निवडणूक जाहिरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जाहीरनाम्यात कोण-काणते मुद्दे असावेत, यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय.

दरम्यान, येणारी लोकसभा निवडणुक आपण स्वबळावर लढणार असल्याचं नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“राफेल घोटाळ्यामुळे 56 इंचाच्या छातीत धडकी भरली आहे”

-राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करु नये, साहित्य संमेलनात गडकरींचा सल्ला

-“ओबीसींना 10 टक्के आरक्षण वाढवून देऊन आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करा”

-“राज्याच्या मंत्रीमंडळात एक तरी शेतकऱ्याचं पोरगं दिसतंय का”??

-“बच्चू भाऊ, या सरकारमध्ये दम नाही, दम आहे तो फक्त तुमच्यात”