बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…त्यासाठी युवकांना जगाच्या एक पाऊल पुढं रहावं लागेल- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | मोदी सरकारनं गेल्या वर्षी 29 जुलैला नवं शिक्षण धोरण जाहीर केलं होतं. या धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भारतीय युवक पुढाकार घेत आहेत. युवक डिजीटल इंडियाला गती देत आहेत. या युवा पिढीला त्यांच्या स्वप्नानुसार वातावरण मिळेल त्यावेळी त्यांची शक्ती किती वाढेल याचा विचार करा, नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देते की देश त्यांच्यासोबत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नव्या शिक्षण धोरणातील मुक्तता, विद्यार्थी किती शिकतील हे विद्यापीठ आणि परीक्षा मंडळं ठरवणार नाहीत. नव्या बहुविध शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नव्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत, असंही मोदी म्हणालेत.

आरोग्य, संरक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात युवकांनी एक पाऊल पुढं असलं पाहिजे. भारतानं आता आत्मनिर्भर व्हायला हवं. गेल्या वर्षभरात 1200 संस्थामध्ये कौशल्य विकासासाठी नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, 8 राज्यातील 14 अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 5 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होत आहे. यामध्ये हिंदी, तामिळ, तेलुगू, मराठी आणि बांगला भाषेचा समावेश आहे. तर देशातील 11 भाषांमध्ये अभ्यासक्रम भाषांतरीत करण्यात येत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं दोन वर्षांसाठी निलंबन करा”

“मुली रात्रभर बीचवर फिरतात याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही”

दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

गारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर!

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More