बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या चित्रपटांना क्लीनचीट देतं, नाझी जर्मनीत हेच व्हायचं”

मुंबई | आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शहा कायम चर्चेत असतात. अशातच एका मुलाखतीमध्ये बोलताना शहा यांनी बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच त्यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.

फिल्म इंडस्ट्रीला सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करण्यासाठी प्रोत्साहन केलं जात आहे. सरकारच्या कामाचं कौतुक केलं जाणारे सिनेमे बनवले जातात. त्या सिनेमांना फंडिंगही केलं जातं महत्त्वाचं म्हणजे त्या चित्रपटांना क्लीनचीट देण्याचं आश्वासनही देण्यात येत असल्याचं नसीरूद्दीन शहा यांनी म्हटलं आहे.

चित्रपटाच्या या कामाची तुलना शहा यांनी थेट नाझी जर्मनीसोबत केली आहे. नसीरूद्दीन शहा म्हणाले की, जे उत्तम सिनेमा निर्मिती करतात अशा चित्रपट निर्मात्यांना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमा तयार करण्यासाठी सांगितलं जातं. माझ्याकडे याबाबत पुरावा नसला तरी सध्या ज्या प्रकारचे चित्रपट येत आहेत त्यावरून आपण अंदाज लावू शकतो, असंही नसीरूद्दीन शहा यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी तीन खानांवरही भाष्य केलं.

दरम्यान, आजपण इंडस्ट्रीमध्ये तीन खान टॉपला आहेत. त्याना आव्हान देऊ शकत नाही आणि आजची ते रिजल्ट देत आहेत. मी कधीही भेदभावाचा समना केला नाही, असंही शहा म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ भागात अलर्ट जारी!

बीएससी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात ‘हे’ मोठे बदल, आयएनसीने केली मोठी घोषणा

रणवीर-दीपिका झाले गुंठामंत्री! मुंबईमध्ये खरेदी केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची जमीन

”ही’ गोष्ट करून मोदींनी दाखवून दिलं, ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’”

“शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पंजाबला त्रास देऊ नये”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More