एकीकडे तिरंगा यात्रा, दुसरीकडे अश्लील नृत्याचं आयोजन

नाशिक | देशभक्तीच्या नावाखाली नाशिकमध्ये अश्लील नृत्याचं आयोजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे भाजपचे आमदार अपूर्व हिरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

नाशिकच्या कामटवाडा परिसरात हा प्रकार घडलाय. अपूर्व हिरे यांच्या कार्यकर्त्यांनीच या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे काहींनी चक्क व्यासपीठावर जाऊन मुलींच्या अंगावर पैसे उधळले. एकीकडे भाजप तिरंगा यात्रा काढत असताना दुसरीकडे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय.