बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली ‘चूल मांडा’ आंदोलन करणार

मुंबई | गॅस, पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीविरोधात आज चूल मांडा आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात असेल, त्या सर्व पेट्रोल पंपांवर राष्ट्रवादीतर्फे हे आंदोलन केलं जाईल.

आज सकाळी 11 वाजता या आंदोलनाची सुरुवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

राज्यात ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावलेले असेल किंवा जाहिरात झळकत असेल, त्या-त्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे बॅनर किंवा फलकाखाली दगडाची किंवा विटांची चूल ठेवली जाईल.

चूल मांडा आंदोलन राज्यभरात केलं जाणार असून रुपालीताई चाकणकर या आंदोलनात पुण्यातून सहभागी होतील. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून चूल मांडा आंदोलनात सहभागी होणार असल्याचं रुपालीताई चाकणकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत असल्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! खासगी रुग्णालयांमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट, म्हणाले..

…म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली; मनसेनं सांगितली अंदर की बात

गजा मारणेनंतर पोलिसांची नजर आता पुण्यातील ‘या’ खतरनाक टोळीवर!

आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना राजेश टोपेंनी दिला हा कानमंत्र; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More