बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तू ठाकरे है तो मै राणा हूँ, देखते है…’; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई | तू ठाकरे है तो मै भी राणा हूँ, मुंबई की बेटी और विदर्भ की बहूं हू.. देखते है किसमे कितनी ताकद है… असा इशारा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिला आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी, राज्यावरचं संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हुनमान चालिसाचं पठण केलं पाहिजे, अशी मी विनंती केली होती, असं राणांनी सांगितलं.

पदाने, वयाने मोठे आहेत, म्हणून मी हात जोडून विनंती केली होती की हनुमान चालीसा पठन करा… त्यांनी केला नाही म्हणून आम्ही हनुमान चालिसा म्हणण्याचं ठरवलं. पण उद्धव ठाकरेंनी धमकी दिली, ज्या पायाने तुम्ही आलात, त्या पायाने वापस जाणार नाही, असं त्या म्हणाल्या.

ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान मुंबईत येणार होते, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही आमचं आंदोलन वापस घेतलं. दुपारी 3 वाजता आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी पॉवरचा वापर करत जे करायचं तेच केलं, असा राणांनी सांगितलंय.

शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; दसरा मेळाव्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर

पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र आता नगरमध्ये, विखेंच्या प्रयत्नाला यश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More