Loading...

“राष्ट्रवादीच्या नेत्याचं ते वैयक्तिक मत; त्याचा पक्षाक्षी काहीही संबंध नाही”

मुंबई |  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आणि दिग्गज नेते माजिद मेमन यांनी जर राज्यात आघाडीचा पराभव झाला तर त्याला जास्त जबाबदार काँग्रेस असेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर माजिद मेमन यांचं वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. मेमन यांच्या वक्तव्याशी पक्षाचा कुठलाही संबंध नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अन्य मित्र पक्षांनी एकत्र विधानसभा निवडणूक लढली आहे. जातीयवादी पक्षांना हद्दपार करण्यासाठी या पुढेही आम्ही एकत्र लढू, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

Loading...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यात तुफान प्रतिसाद मिळाला. पण काँग्रेसकडून नरमाई दाखवण्यात आली. राहुल गांधींनी मुंबईसह महाराष्ट्रात दौरे करून काही सभा घेतल्या परंतू काँग्रेस नेत्यांनी मात्र निवडणुकीसाठी लागणारी मेहनत घेतली नाही, असा आरोप माजिद मेमन यांनी केला होता.

दरम्यान, सोमवारी महाराष्ट्रात विधानसभेसाठीचं मतदान पार पडलं. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतू मेमन यांच्या वक्तव्याने निकालाआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीत तू तू-मैं मैं सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Loading...

‘श्रीराम समर्थ’ चित्रपटानिमित्त शंतनू मोघे यांच्याशी मारलेल्या खास गप्पा…

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Loading...