बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रातले भाजपचे नेते मोदींचं पण ऐकत नाहीत”

मुंबई | कोरोनामुळे निर्बंध घातलेले असताना महाराष्ट्रातील भाजपचे ते निर्बंध खुले करण्यासाठी आंदोलन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण ऐकत नसल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने काळजीत पडले आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते लोकल सेवा लवकरात लवकर चालू करावी आणि धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करत असल्याचं नवाब मलिक म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तशाप्रकारे अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र तरीही भाजप नेते आंदोलन करत आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षाच्या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच मलिकांनी सुशांत सिंह प्रकरणावरून भाजपवर टीका केली.

दरम्यान, सीबीआयने सुशांतच्या मृत्यूचं कोणतही ठोस कारण सांगितलं नाही. बिहार निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठीच हे प्रकरण रंगवण्यात आलं होतं. राज्याला बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आला असल्याचं मलिक म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास”

“सिद्धार्थ माझा प्रियकर नाही पण तो सतत आजूबाजूला हवासा वाटतो”

पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पत्नीने संशय आलेल्या महिलेसोबत केलं हे धक्कादायक कृत्य

हिंदू सणांवर निर्बंध लावून सणांचं महत्व कमी करण्याचा ठाकरे सरकारचा डाव- नितेश राणे

मोठी बातमी! पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, वाचा काय सुरू, काय बंद?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More