बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उड़ता गुजरात’ म्हणत नवाब मलिकांचं सूचक ट्विट

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज कनेक्शन आणि एनसीबीच्या कारवाई विरोधात आरोप-प्रत्यारोप आणि खुलास्यांचा सपाटा लावला आहे. गुजरात एटीएसने तब्बल 120 किलो ड्रग्ज ताब्यात घेतलं. या कारवाईनंतर नवाब मलिकांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात गुजरातच्या कच्छ येथील मुद्रा बंदरावरून 3 हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. डीआरआयने जप्त केलेल्या या ड्रग्जची किंमत तब्बल 21 हजार कोटींच्या आसपास आहे. डीआरआय पाठोपाठ आता एसआयटीने देखील 120 किलो ड्रग्ज ताब्यात घेतलं. या ड्रग्जची किंमत तब्बल 600 कोटींच्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे.

एटीएसच्या या कारवाईनंतर नवाब मलिकांनी एक सुचक ट्विट केलं आहे. पुन्हा एकदा गुजरात कनेक्शन. उड़ता गुजरात, असं सुचक ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे. महाराष्ट्रात ड्रग्ज प्रकरणात अनेक गौप्यस्फोट केल्यानंतर नवाब मलिकांनी पुन्हा एकदा सुचक ट्विट केलं त्यामुळे नवाब मलिक आता अजुन काही खुलासा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, एटीएसने गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील मालिया मियाणा येथून हे ड्रग्ज ताब्यात घेतले आहेत. तर हे हेरॉईन पारिस्तानमधून आणण्यात आलं असून 120 किलो ड्रग्ज सोबत 4 जणांनाही ताब्यात घेतलं आहे. एका महिन्यात गुजरातमध्ये ड्रग्ज विरोधात केलेली ही दुसरी कारवाई आहे. गुजरातमध्ये सापडणाऱ्या ड्रग्जवरून मलिकांनीही निशाणा साधला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन मात्र ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण

“असा शिवआराधक शोधुन सापडणार नाही!” बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांचा तीव्र शोक

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

“बाळासाहेबांची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन आस्मानचा फरक”

“नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तिला…”, ‘या’ मंत्र्याची कंगनाविरोधात रोखठोक भूमिका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More