मुंबई | ट्वीटरवर ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार जुंपलेली पाहायला मिळतीये. राष्ट्रवादीने ईव्हीएमवर एक व्यंगचित्र पोस्ट करत भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
काल अधिवेशनाच्या निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मी पुन्हा येईन याच निर्धाराने महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणााठी…, अशी कविता केली होती. याच भाषणाचा धागा पकडत आज राष्ट्रवादीने ‘यांचं ईव्हीएमवर बरंच नियंत्रण दिसतंय’, असं व्यंगचित्र पोस्ट करत भाजपला टोला लगावला.
राष्ट्रवादीच्या व्यंगचित्रावर भाजपने देखील त्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ‘बारामतीत ईव्हीएम ठीक चालतंय… तिथला विजय हा तुमचा महाराष्ट्राला मूर्ख बनविण्याचे धंदे पवार साहेबांनी बंद करावेत’, असं म्हटलंय.
दरम्यान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये नेहमीच जोरदार कलगीतुरा रंगलेला दिसून आला आहे.
कशाच्या जोरावर या वल्गना मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब…
याची जनतेला पूर्ण कल्पना आहे..@CMOMaharashtra @BJP4India @BJP4Maharashtra #Elections2019 pic.twitter.com/bLse7oJOM4— NCP (@NCPspeaks) July 3, 2019
तुमचा स्वतः वर विश्वास नाही, EVM ला कशाला दोष देताय!
याला म्हणतात जिंकता येईना, EVM वाकडे!@PawarSpeaks @supriya_sule pic.twitter.com/srqbSHHaBL— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 3, 2019
महत्वाच्या बातम्या-
ममतांना मोठा झटका; हा महत्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला
-मॅच इंग्लंड-न्यूझिलंडची अन् टेन्शन पाकिस्तानला….!
टिक टॉकची जादू… ३ वर्षापूर्वी घर सोडून गेलेला नवरा बायकोला परत मिळाला!
-“अनेकदा लढाईत मी एकटा पडलो पण लढत राहिलो याचा अभिमान”
Comments are closed.