रत्नागिरी | संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात, शिवसेनेचा पराभव जसा बाहेर होतो, तसा महाराष्ट्रात होण्यास वेळ लागणार नाही, याची मला खात्री आहे, असा टोला भाजप नेते निलेश राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांना लगावलाय.
बिहार निवडणुकीच्या निकालावरून निलेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणे बोलत होते.
शिवसेनेची लायकी काय होती हे आम्हाला माहिती होतं. संजय राऊत विसरले होते, गोव्यामध्ये ही तसेच झालं होतं. गोव्यामध्ये सर्व मिळून 900 मते शिवसेनेला मिळाली होती, अशी टीका निलेश राणेंनी केलीये.
दरम्यान, बिहार निवडणुकीत शिवसेनेला अनेक ठिकाणी नोटापेक्षा कमी मते मिळाल्यानं निलेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.
महत्वाच्या बातम्या-
शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा लव सिन्हाला पराभवाचा धक्का!
“देवेंद्र फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”ॉ
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला- शरद पवार
तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार
…म्हणून मुख्यमंत्री झाल्यास नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत- संजय राऊत