बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत- निलेश राणे

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेच्या वापराला दिवाकर रावतेंनी विरोध केला. मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणं चुकीचं आहे, सभागृहात कामकाज सुरु असताना इंग्रजी भाषेचा वापर होतोय, हा प्रकार हास्यास्पद आहे, असं रावते म्हणाले.

मराठीबाबत अर्थसंकल्पात तरतूद नाही हे मला बोलावं लागतंय, मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र तरीही मराठीसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही, मी मेल्यावर साहेबांना भेटलो तर मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ?, असा सवाल दिवाकर रावतेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये अवस्था इतकी वाईट झाली आहे की सभागृहात आम्ही मेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार असं बोलून गेले, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे फक्त 35 टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेत सर्व्हे आणि प्रमुख पदासाठी मतदान झालं तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाही, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

उधारीचे पैसे मागणं पडलं महागात; विधवा महिलेसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना

गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदारानं महिला आमदाराच्या गालाला लावला हात, पाहा व्हिडिओ

पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा पेच अखेर सुटला; ‘या’ तारखेपासुन परीक्षेला सुरूवात

लालूंच्या सुरक्षा रक्षकांनी पळवल्या गाद्या आणि उशा; रुग्णालयाची पोलिसांत धाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More