बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कालीमातेच्या तोंडात सिगारेट पाहून नेटकरी भडकले, वाचा सविस्तर

मुंबई | बाॅबी देओलच्या ‘आश्रम’ ते अभिनेता अमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटासह अनेक चित्रपट आणि वेब सिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये आता ‘काली’ या माहितीपटाचा ( Documentary) समावेश झाला आहे. चित्रपट निर्मात्या लिना मनिमेकलाई यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं.

या माहितीपटाच्या पोस्टरमधून कालीमातेचा अपमान करण्यात आला असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. काहींनी प्रतिक्रीया देत थेट केंद्रीय गृहमंत्री (Home Minister) अमित शहा यांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.

हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला या पोस्टमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये कालीमातेच्या अवतारात असलेली ही महिला सिगारेटच ओढताना दिसत आहे. या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. हे पोस्टर पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लिना यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर #ArrestLeenaManimekal हा हॅशटॅग अनेकांनी वापरला आहे. कालीमातेच्या तोंडात सिगारेट पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी ! बहुमत चाचणीपूर्वी शिवसेनेला आणखी एक झटका

‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात

मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच

शरद पवारांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More