ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाला मंत्री महादेव जानकर यांचा पाठिंबा

पुणे | ब्राह्मण ही एक जात किंवा धर्म नसून एक व्यवस्था आहे. तरीही या समाजात 80 टक्के गरिबी आहे. मग या समाजाने आरक्षण का मागू नये?, असा सवाल दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विचारला आहे. 

पुण्यातील ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  ब्राह्मण समाजासाठी नवी योजना तयार करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

ब्राह्मण समाज हा दाता समाज आहे. त्यांच्यात समाजातील देशातील राजकारण बदलण्याची ताकद आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वसामावेशक नेतृत्व असून ते एक दिवस पंतप्रधानही होतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळी केली.  

महत्त्वाच्या बातम्या-

-पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त केल्याची घोषणा; मात्र तेवढ्या रुपयांची कपात नाहीच!

-बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची नाही, तर इच्छाशक्तीची गरज!

-भाजप सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल 5 रूपयांनी स्वस्त

-किमान 3-4 मंत्र्यांना कपडे काढून मारा, पोलिस तुम्हाला काहीच करणार नाही!

-शेट्टींनीं सांगितलं तर एखाद्या मंत्र्याला भोकसायला कमी करणार नाही!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या