बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार

नवी दिल्ली | रिझर्व बॅंकेने गुगलला बँकिंगसंबंधी सेवा सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र या नंतरही करोडो लोक गुगल पे द्वारे ट्रान्झॅक्शन करत आहेत. रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशांचं पालन करण्याचा निर्णय आता गुगलने घेतला आहे. याचा थेट परिणाम ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या लोकांवर होणार आहे.

यू-ट्यूब, प्ले स्टोअर व पैशांच्या देवाणघेवाण करत असणाऱ्या सर्व्हिसवर रिझर्व बँकचे नियम लागू होणार आहेत. येत्या 1 जानेवारी 2022 पासून गुगल एचटीएम आणि क्रेडिट कार्डची माहिती स्टोअर करुन ठेवणार आहे. ही माहिती स्टोअर केल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या कार्डचा नंबर त्या ठिकाणी पाहणे शक्य होणार नाही. एक्सपायरी डेट देखील त्या ठिकाणी दिसणार नाही.

कार्डचा सीव्हिव्ही नंबर आणि नंतर आलेला ओटीपी टाकून याआधी ग्राहकांना पेमेंट करावं लागत होतं. आता मात्र त्या ठिकाणी वारंवार कार्डचा नंबर आणि एक्सपायरी डेट भरावी लागणार आहे. जर तुम्ही रु-पे, अमेरिकन एक्सप्रेस, डिस्कव्हर किंवा डिनर्स कार्डचा वापर करत असाल तर गुगल तुमच्या या कार्डची माहिती 31 डिसेंबरपर्यंतच आपल्याकडे ठेवू शकणार आहे.

या कार्डना नवीन फॉरमॅट लागू होत नाही. यामुळे तुम्हाला 1 जानेवारीपासून मॅन्युअली नंबर टाकून नेहमी ट्रान्झीक्शन करावं लागणार आहे. संवेदनशील माहिती सुरक्षित रहावी यासाठी आरबीआयने कार्ड डिटेल्स सेव्ह न करण्याचे आदेश दिले आहेत. जर तुम्ही व्हिसा किंवा मास्टरकार्ड या कंपन्यांचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला नवीन फॉरमॅटमध्ये कार्ड डिटेल्स सेव्ह करण्यासाठी ऑथेराईझ करावं लागणार असल्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मोदी सरकारच्या काळात भारतीयांची परदेशाकडे ओढ; ‘इतके’ लाख नागरिक परदेशात स्थायिक

गॅस सिलेंडर पुन्हा महागला, बसणार एवढ्या रुपयांचा फटका

“कोरोना हे मोदींच्या विरोधातलं षडयंत्र होतं, जे मेले त्यांना डॉक्टरांनीच मारलं”

‘2014 नंतरचं स्वातंत्र्य हे असं आहे…’; शिवसेनेचा मोदींना सणसणीत टोला

ओमिक्रॉनविरोधात कोविशिल्ड पुरेशी की बुस्टर डोसची गरज?, अदर पूनावाला म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More