बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फक्त 15 रूपयात नवा सातबारा, आता जमिनीच्या खोट्या नोंदीही करता येणार नाही”

पुणे | 1 ऑगस्टला सर्वत्र महसूल दिन साजरा केला जातो. या महसुल दिनाच्या निमित्तानं राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी जमिनीच्या खोट्या नोंदी आणि फसवाफसवीचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे अनेकांना सातबारा काढण्यास अडचणी येत होत्या. त्यातच आता तंत्रज्ञानाच्या मदतीने सातबारा काढण्याचं काम आता आणखी सोपं करण्याचा प्रयत्न शासनानं केला आहे.

बाळासोहब थोरात यांनी नव्या ऑनलाईन फाॅरमॅटध्ये सातबारा मिळणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तलाठ्याचा वेळ वाचणार आहे आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही, असं बाळासाहोब थोरात यांनी सांगितलं आहे. त्यासाठी बँकेसोबत करार करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना फक्त 15 रूपये मोजावे लागणार आहेत, अशी माहिती देखील थोरातांनी दिली आहे.

1 ऑगस्टपासून सातबारा नव्या फाॅरमॅटमध्ये मिळणार आहे. त्याचबोरबर 4 ठिकाणी जर जमिनी असतील तर त्याचा एकत्रितरित्या एकच सातबारा मिळेल. ज्यांच्या सातबाऱ्यात 2008 पासून बदल झाले आहेत. त्यांचा सातबारा देखील नव्या डिजीटल स्वरूपात मिळणार आहे. तर स्टाॅम्प ड्युटीत देखील 6 महिने सवलत देण्यात आली आहे.

दरम्यान, सातबारा आता ऑनलाईन पद्धतीनं काढणार असल्यानं त्यात कोणताही गैरप्रकार होणार नाही. त्याचबरोबर खोट्या नोंदी देखील होणार नाही. त्यात काही अडचणी आल्या तर आम्हाला सांगा आम्ही त्या अडचणी दूर करू, असं आश्वासन देखील बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

जीवाचं रान करून 16 कोटी जमवले, इंजेक्शनही दिलं पण….; चिमुकल्या वेदिकाची झुंज अपयशी

‘कोरोनाची तिसरी लाट अटळ पण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

अजब लग्नाची गजब गोष्ट; अन् चक्क वयाच्या 60 व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर

बलात्कारानंतर आरोपीशी लग्न करण्यासाठी पीडितेची सर्वोच्च न्यायालयात धाव अन्..; चक्रावुन टाकणारा प्रकार

मुंबईकरांनी करून दाखवलं; मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत विक्रमी घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More