मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये घमासान पाहायला मिळालं. सभागृहात उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी भाजपवर टोलेबाजी केली.
हातातोंडाशी आलेला घास तिन पक्षाचं सरकार स्थापन झाल्यामुळे गेला आहे. मतदारांनीही पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत भाजपला नाकारलं. येत्या चार महिन्यात राजीनामे देऊन आमच्याकडे येतील कळणारही नाही, असं अजित पवार म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या टीकेवर भाजप नेते निलेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
कोणाला घ्यावा कोणाला न घ्यावा हा तुमचा प्रश्न आहे पण इतक्या पलट्या मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मराठा मी मानत नाही. गप्प बसून 5 वर्षे उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काय वाटलं नस्त पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. राणेंनी कालही ट्विट करत राज्य सरकार आणि पवारांवर टीका केली होती.
दरम्यान, 3 पक्षाचे सरकार आले आणि हाता तोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय असं आज अजित पवार बोलले. अजित पवार तुम्ही पत्रकार परिषदेत रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिन खात्याचे 3 महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?, असा सवाल राणेंनी पवारांना केला होता.
कोणाला घ्यावा कोणाला न घ्यावा हा तुमचा प्रश्न आहे पण इतक्या पल्ट्या मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मराठा मी मानत नाही. गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलं असतं तर काय वाटलं नस्त पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?? https://t.co/EDCgVAz3u8
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 16, 2020
थोडक्यात बातम्या-
“राज्यातील दोन दिवसाचं अधिवेशन आठवं आश्चर्य तर केंद्राने रद्द केलेलं अधिवेशन हे कितवं आश्चर्य”
चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
‘मी हाडाचा शेतकरी आहे’; वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करणाऱ्या दानवेंवर कडूंनी साधला निशाणा
‘हिंमत असेल तर भाजपने राष्ट्रगीत बदलून दाखवावं’; ममता बॅनर्जींचं भाजपला आव्हान
“कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलं”