Top News महाराष्ट्र रत्नागिरी

“शेतीतलं शिवसेनेला काय कळतं?, शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही ते फक्त…”

रत्नागिरी | केंद्र सरकारच्या कृषी विरोधा कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी एकत्र येत दिल्लीमध्ये गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन केलं आहे. सोमवारी शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला राज्यातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठींबा दर्शवला. शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शेतीतलं शिवसेनेला काय कळतं? शेती हा शिवसेनेचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध दर्शवायचा म्हणूनच शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे.

शिवसेना हा गोंधळलेला पक्ष असून त्यांच्या पक्षचा उतरता काळ चालू झाला आहे. शिवसेनेला दिल्लीत कुणी किंमत देत नाही. अलीकडच्या काळात कोणत्या एका भूमिकेवर शिवसेना ठाम राहिल्याचं दिसून आलेलं नसल्याचं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, 2010 मध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि तत्कालीम कृषीमंत्री शरद पवारांनी लिहिलेलं पत्र दाखवून भाजपने त्यांना त्यांच्या मागण्यांची आठवण करुन दिली.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरली, संपूर्ण पक्ष शरद पवारांपुढे लीन झालाय”

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे

कृषीमंत्री असताना पवारांनी कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर केला खुलासा; म्हणाले

“कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान की कृषीमंत्री

देशातील शेतकरी आंदोलनादरम्यान केरळ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या