बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कारस्थान करून निवडणूक जिकंता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण…”

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचा (Sindhudurh State Bank Election) आज निकाल लागला आहे. शिवसेनेचे सतीश सावंत यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवानंतर अज्ञातवासात असलेले भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांचही ट्विट चर्चेत आलं आहे.

“धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला, कारस्थान करून निवडणूक जिकंता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण ही सिंधुदुर्गाची माती आहे. इथं खरं काहीतरी करणाऱ्यालाचं न्याय मिळतो. काळ्या विन्या राऊत तू बोलत राहा आमची निवडणुक सोप्पी होते,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनाही पराभव स्विकारावा लागला आहे. सावंत याचा पराभव करत विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या निवडणुकीत आत्तापर्यंत महाविकास आघाडीला 5 आणि भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, सकाळीचं अज्ञातवासात असलेले निलेश राणे यांनीही यासंदर्भात ट्विट केलं होतं. नितेश राणेंच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये नितेश राणे सतीश सावतांच्या मानेवर उभे राहिलेले दिसून येत आहेत आणि फोटोखाली ‘गाडलाचं’ असं म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपची सरशी, सतीश सावतं यांचा पराभव

‘ मला वाटतं लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू हा बोगसपणा’

“माणसाचं मन भरकटलं की अशी माणसं गांजा प्यायल्यासाारखी बोलतात”

पोस्टरबाजी: “नितेश राणे हरवला आहे, शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस”

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’; रोहित पवारांची MPSCला विनंती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More