नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये देशातील बळीराजासाठी आणि ग्रामीण भारतासाठी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय कार्यक्रम जाहीर केला असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.
शेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या अंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा संयंत्र दिलं जाईल. या अंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा संयंत्र दिलं जाईल. जी राज्ये केंद्र सरकारच्या कायद्यांचं मॉडेल स्वीकारतील त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. शेतकऱ्यांसाठी 6.11 कोटीची विमा योजना असेल. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उथ्थान महाभियान’ या पुढील काळात 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल, असं सीतारमण यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान कुसुम योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पाण्याच्या प्रश्नाशी झुंज देत असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाय योजना केल्या जातील. 2009-14 दरम्यान चलनवाढ 10.5% होती, असंही सीतारमण यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“आशिष शेलारांना टिंगलटवाळीशिवाय काही काम उरलं नाही”
…म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
“भारतात रेस्टॉरंट सुरु करण्यापेक्षा बंदुकीचं लायसन्स मिळवणं सोपं”
जगात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ, चीनमधून 324 भारतीय मायदेशी
शहापूरच्या आदिवासी पाड्यातील झोपडीत शरद पवारांनी घेतला जेवणाचा आस्वाद!
Comments are closed.