बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही; राजेश टोपेंची मोठी घोषणा

जालना | संपूर्ण देशभरात सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. देशातील सर्वाधिक लसीकरण केलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राचं नाव समोर आलं आहे. त्यातच आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते जालना दौऱ्यावर असताना त्यांनी याबाबत मोठी घोषणा केली.

महाराष्ट्रात आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार असून या मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांना मिळणार नसून जे लोक आजारपणामुळे किंवा इतर व्याधींमुळे घरातून बाहेर पडू शकत नाहीत, अशा लोकांना घरोघरी जाऊन लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

महाराष्ट्रातील जे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत किंवा ज्यांना काही आजार आहेत, अशा लोकांचं लसीकरण यापुढे घरीच करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या महाराष्ट्रात दोन कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेतल्यामुळे ठाकरे सरकारने सात हजार कोटी रुपयांची लसीकरणाची तरतूद केली होती, ते पैसे शेतकऱ्यांसाठी वापरावे अशी मागणी केली होती. यावर शेतकऱ्यांची आम्ही नेहमीच काळजी घेत आलो आहोत आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव सज्ज आहोत, असं म्हणत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रावसाहेब दानवे यांना उत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘…तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल’; पवारांच्या निवडणूक एकत्र लढण्याच्या वक्तव्यावर पटोलेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 24 तासात फक्त 2 जणांचा मृत्यू, तर नव्या 15 बाधितांची नोंद

ब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का? अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

“सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेचं लोणी खाणं बरं वाटतं का?”

“काँग्रेस नेते राहुल गांधीच पंतप्रधान होणार आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More