बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर पुन्हा रॅपिड अँटीजेन आणि RTPCR चाचणी करण्याची गरज नाही’

नवी दिल्ली | भारतात सर्व लॅबमध्ये दररोज सुमारे पंधरा लाखांच्या वर चाचण्या होत असतात. मात्र, या प्रयोगशाळांमध्ये येणाऱ्या स्वॅब नमुन्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे प्रयोगशाळांवर चाचण्यांचा पडणारा ताण कमी करण्यासाठी आयसीएमआरने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

एखाद्या व्यक्तीला रॅपिड अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणीमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यास, त्याची पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. तसेच कोरोना रुग्ण बरा झाल्यास रुग्णालय सोडतानाही पुन्हा चाचणीची गरज नाही, अशा सूचना भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने म्हणजेच आयसीएमआरने जाहिर केल्या आहेत.

आंतरराज्य प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींना आरटी-पीसीआर चाचणीचे घातलेले बंधन पूर्णतः: रद्द करण्यात आले आहे. मोबाईल टेस्टिंग लॅब आता उपलब्ध झालेल्या आहेत. राज्यांनी त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन द्यावं, असंही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर सर्व सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या चाचण्या करण्यास परवानगी द्यावी. तर गाव-खेड्यांमध्ये रॅपिड अँटीजेन बूथ सुरू करावेत. असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

दरम्यान, देशात विविध ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये हे बूथ सुरू करता येतील. मात्र, त्या ठिकाणी चाचण्यांसाठी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल, असं आयसीएमआरने सुचवलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नियतीने किती निष्ठूर व्हावं? मुलीनं काढलं चित्र, मात्र पहायला आता बापच राहिला नाही!

पुणे हादरलं! चक्क गुंडाने केली पोलीस हवालदाराची हत्या

“घरावर दरोडा घालून माझ्या 2 गाड्या चोरल्या”; परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मावर गंभीर आरोप

केंद्र सरकारची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना योद्ध्यांना पुन्हा मिळणार 50 लाखांचं विमा संरक्षण

मराठा आरक्षणाच्या निकालाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More