बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क न लावल्याने महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल

नाशिक |  मास्क न लावणाऱ्यांवर नाशिक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मास्क न वापरल्याने नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

निफाड तालुक्यातील डोंगरगावचे पांडुरंग दत्तू आव्हाड या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न लावल्याने इतरांना त्रास होईल असं कृत्य केल्यानं आयपीसी 188 कलमाअंतर्गत ही कारवाई होणार आहे.

केंद्र सरकार राज्य आणि राज्य सरकार कोरोनाला पळवून लाववण्यासाठी निकाराचा लढा देत आहे. यासंबंधी नागरिकांवर काही बंधने लादण्यात आलेली आहेत. तशाच काही सूचना देखील पाळण्यास सांगितल्या गेल्या आहेत. मात्र नागरिक सऱ्हास सूचना पायदळी तुडवत आहेत. मात्र घराबाहेर न पडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कोरोनाविषयी बऱ्यापैकी जनजागृती केली गेली आहे.

दरम्यान, काल एकाच दिवसात महाराष्ट्रात 82 रूग्ण सापडले आहेत.कालपर्यंत 220 असलेले कोरोनाचे रुग्ण आज 302 पर्यंत पोहोचले आहेत. एका दिवसामध्ये मुंबईत सर्वाधिक 59 नव्या रुग्णांची नोंद झाली.

ट्रेंडिंग बातम्या-

“कठीण काळात देखील पंतप्रधान मोदींनी केअर फंड उघडून प्रसिद्धीची संधी सोडली नाही”

अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल; ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीमधील तबलीघींच्या मरकझमध्ये नेमकं काय चालतं???

खलनायक ठरलेले मौलाना साद कोण आहेत? त्यांना एवढा मान का? वाचा संपूर्ण माहिती

कोट्यवधी हिंदूच्या तपासणीसाठी किट देऊ न शकलेलं सरकार ‘तबलिगी मर्कझ’वर खापर फोडतंय- जिग्नेश मेवानी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More