मोबाईल वापरकर्त्यांसाठी खूशखबर! आता 28 नाही तर ‘एवढ्या’ दिवसांचा असणार रिचार्ज प्लॅन
नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून टेलिकॉम कंपन्या 30 दिवसांऐवजी 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना देत होत्या. त्यातच आता टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने ग्राहकांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम प्रोव्हायडर्संना 28 दिवसांऐवजी 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन, आडडिया सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्या एक महिन्याच्या रिचार्जच्या नावाने केवळ 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन देत होत्या. एका वर्षांमध्ये 28 दिवसांची बचत करतात, अशी तक्रार ग्राहकांकडून करण्यात आली होती.
दोन महिन्यांच्या रिचार्जमध्ये 54 किंवा 56 दिवसांचा आणि तीन महिन्यांच्या रिचार्जमध्ये 84 दिवसांची वैधता मिळत होती. आता टेलिकॉम कंपन्यांना ट्रायच्या नवीन आदेशानुसार 30 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन नोटीफिकेशन जारी झाल्यापासून 60 दिवसांच्या आत सादर करावे लागणार आहेत.
दरम्यान, महागाईच्या झळा जीवनावश्यक बनलेल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कंपन्यांनी 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन केल्याने 364 दिवसांची वैधता मिळत होती. त्यामुळे जिओ, एअरटेल आणि वोडाफोनसारख्या कंपन्यांना कोट्यावधी रूपयांचा फायदा मिळत आहे. ग्राहकांच्या हितासाठी ट्रायने आता कंपन्यांना 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन करणं बंधनकारक केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
Petrol Diesel Price: जाणून घ्या आजचे ताजे दर
कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली, WHO म्हणाले…
‘या’ तारखेपासून पुण्यातील शाळा सुरु होणार, अजित पवारांनी केली मोठी घोषणा
“…त्यामुळे शरद पवार महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत”
“जनाब संजय राऊत फडणवीसांच्या आरोपांमुळे बावचळले आहेत, त्यांचा झिंग झिंग झिंगाट झालाय”
Comments are closed.