बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता कळलं का?,वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता”

मुंबई | सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपली उचलबांगडी झाल्यानंतर दोन- तीन दिवसांनंतर त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला बार आणि रेस्टॉरंटकडून 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. याच पार्श्वभूीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची मर्सिडिज ताब्यात घेतली. त्यात काही नंबर प्लेट्स, पाच लाख रुपयांची रोकड आणि नोटा मोजण्याची मशीन आढळून आली होती. वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याची मशिन कशीकाय असा सवाल सर्वांना पडला होता. मात्र परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावरून सोमय्या यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

आता कळलं का?, वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता , असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सध्या परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता”

“100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, गृहमंत्र्यांसोबत त्यांनीही राजीनामा द्यावा”

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे- राज ठाकरे

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

अनिल देशमुख यांनी आता स्पष्टीकरण नाही तर राजीनामा द्यावा- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More