मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं
औरंगाबाद | औरंगाबादमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलाच्या लग्नाला अवघे 5 दिवस बाकी असतांना आई वडिलांचा दुर्देवी अपघात झाला आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातानं संपूर्ण परिसरत हळहळ व्यक्त केली जात आहे.
संजय छानवाल आणि मीना छानवाल, असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. पुढच्या आठवड्यात त्यांच्या मुलाचं लग्न होतं. मात्र, काळाने छानवाल कुटुंबीयांवर मोठा आघात केला आहे. या घटनेमुळे नातेवाईक आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
संजय छानवाल आणि मीना छानवाल हे दोघे दुचाकीवरुन प्रवास करत होते. तेव्हा भरधाव वेगात असलेल्या ट्रकने या दोघांना चिरडले. हा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी जवळ झाला. हा अपघात इतका भीषण होता की, संजय आणि मीना छानवाल यांच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. आसपासचे लोक मदतीसाठी पुढे आले होते. मात्र, अपघात इतका भीषण होता की, ते दृश्य पाहून बघणाऱ्यांनाही भोवळ आली होती.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले होते. मात्र या अपघातानंतर ट्रकचा चालक आणि किन्नर दोघेही फरार झाले. सध्या खुलताबाद पोलिसांकडून या दोघांचाही शोध घेतला जात आहे. तर या अपघाताने छानवाल कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
थोडक्यात बातम्या –
पुण्यात रुग्णांना बेड मिळेना; कोरोना पॉझिटिव्ह आईने मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण
वाढत्या कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय!
पुण्यातील हृदयद्रावक घटना, कार धरणात कोसळल्याने आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत
…तर अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत- अजित पवार
“फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.