बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicronचा वेग डेल्टाच्या तिप्पट; ‘या’ राज्यातील फैलावामुळे चिंता वाढली

नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. Omicron व्हेरिएंट घातक नसला तरी त्याचा वेग डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Varient) तिप्पट आहे त्यामुळे सध्या ओमिक्रॉनची दहशत पाहायला मिळत आहे.

देशात सर्वात आधी कर्नाटकात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रूग्ण आढळला होता. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान पाठोपाठ जम्मू कश्मीरमध्येही (Jammu Kashir) ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. देशातील एकुण 14 राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याने धाकधूक वाढली आहे.

देशातील ओमिक्रॉनबाधीत रूग्णांची संख्या आता 220 वर जाऊन पोहोचली आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका बघता केंद्र सरकारही (Central Goverment) सतर्क झालं आहे. केंद्राने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क करणारं तातडीचं पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, देशात ओमिक्रॉनचे सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉनबाधीतांची संख्या 65 वर जाऊन पोहोचली आहे. परदेशातून येत असलेल्या नागरिकांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेस मंत्र्याचा मंत्रीमंडळातून पत्ता कट?, नाना पटोेले म्हणतात…

पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, केंद्र सरकारचं राज्यांना तातडीचं पत्र

“अडीचपट जास्त पैसे दिले, पण संज्या म्हणेल…”, निलेश राणेंची खोचक टीका

“आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या”

तालिबान्यांचा गजब कारभार! चुकून शत्रू राष्ट्रालाच पाठवले कोट्यवधी रूपये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More