बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पुण्यातील 1 ली ते 8 वीच्या शाळा बंद

पुणे | कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई शहरातील पहिली ते आठवी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज पुण्यातील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यातील शाळा बंद ठेवण्यावर विचारविनीमय सुरु होता. आज अखरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महपौर मुरलीधर मोहोळ हे सर्व उपस्थित होते.

पहिली ते आठवी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय  या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच शाळा पुन्हा सुरु केल्या होत्या. मात्र, फार कमी दिवसात पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चर्स करावे लागणार आहेत.

दरम्यान, पुणे शहरात 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या दरम्यान रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पाच ते सात दिवसात पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या चारपटीने वाढली आहे. पुण्यात सोमवारी 444 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 2838 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘या’ प्रसिद्ध कंपनीचे फोन आजपासून होणार बंद, वाचा सविस्तर

राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युती?; शिवसेना मंत्र्याचं मोठं वक्तव्य

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, पण अजित पवारांना मोठा धक्का

‘महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही’; अजित पवार संतापले

Omicron नंतर ‘या’ नव्या व्हेरियंटचा शोध, ओमिक्रॉन, कोरोनापेक्षाही भयावह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More