ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट कल्पना; हजाराच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री!
मुंबई | इंधन दरवाढीवरून सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला असताना मुंबईतील उल्हासनगरच्या एका व्यापाऱ्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. उल्हासनगरमध्ये असलेल्या शितल हँडलूम या दुकान मालकाने 1000 रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल मोफत देण्याची नवी ऑफर आणली आहे.
शितल हँडलूम हाऊसचे मालक ललित शिवकानी यांनी केलेल्या घोषणेची संपूर्ण उल्हासनगरमध्ये चर्चा सुरू आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत असतानाच्या पार्श्वभूमीवर शिवकानी यांनी काढलेल्या या ऑफरचा मोठ्या प्रमाणात नागरिक लाभ घेत आहेत.
एकीकडे महागाईमुळे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या पेट्रोलच्या किमतीमुळे आता त्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न या दुकान मालकाने केला आहे. एचपी पेट्रोलपंपाबरोबर शिवकानी यांनी करार केला आहे आणि एक हजारांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 100 रुपयांचे पेट्रोलचे कूपन दिले जाते.
ग्राहकांना मिळालेले पेट्रोलचे कुपन एचपी पंपावर दिल्यानंतर 100 रुपयांचे पेट्रोल गाडीमध्ये भरून दिले जाते. आत्तापर्यंत अनेक नवनवीन शक्कल लढवून दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण अशी पेट्रोल मोफत देण्याची ऑफर पहिल्यांदाच ऐकायला मिळाली आहे. नागरिकांनाही त्याचा फायदा होतो तसेच कोरोनाकाळात डबघाईला आलेल्या व्यवसायालाही फायदा होतो.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुढील दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक!
तपासाला सहकार्य करणाऱ्या खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल !
पोटात चाकू खुपसून बायकोने केली नवऱ्याची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
पुण्याच्या ‘वॉरीयर आजी’चा दिल्लीत सत्कार; आजींना पाहून केजरीवालही झाले अवाक, पाहा व्हिडिओ
शिवसेनेकडून व्हिप जारी; विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता!
Comments are closed.