बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन वेळा तरी मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी- विजय वडेट्टीवार

बीड | ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभरातील वातावरण पेटलेलं पहायला मिळालं. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्ती केली. आता नुकतंच त्यांनी बीडमध्ये ओबीसी परिषदेच्या निमित्तानं माध्यमांशी संवाद साधला.

बीडमध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, जे वंचित आहेत त्यांनाच वंचितांच्या वेदना माहिती आहेत. सध्या गृहीत धरले जात असल्यानं ओबीसींना ताकद दाखवावी लागणार आहे. इतर समाजाला दहावेळा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जातेय. भटक्या विमुक्तांच्या समाजाला किमान दोन वेळा तरी मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी.

बीडमधील मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता पंकडा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. कार्यक्रमात त्या दोघांचीही नावं होती मात्र त्यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली.

दरम्यान, ओबीसींच्या आरक्षणासाठी एकवेळ मी माझं मंत्रीपदही सोडायला तयार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सध्या ओबीसी आरक्षणाकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या – 

भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम बाॅर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, फोटो व्हायरल

मुस्लिम लोकांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या बॅंड बाजासारखी झालीये- असदुद्दीन ओवैसी

HDFC बँकेचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी

काँग्रेसला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला; राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार

धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या तरुणाला नाशिकमधून अटक; तपासात धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More