Top News महाराष्ट्र मुंबई

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आता फक्त ‘इतक्या’ वेळाच देता येणार MPSC परीक्षा, जाणून घ्या!

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी आता विद्यार्थांना मर्यादा घालण्यात आल्या आहेत. येत्या 2021 वर्षातल्या प्रत्येक परीक्षेसाठी हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात परिपत्रक काढलं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच आता राज्य लोकसेवा आयोगानेही विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहा वेळा ही परीक्षा देता येणार आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या मर्यादेपासून सूट देण्यात आली असून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 9 वेळा एमपीएससी परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेस अर्ज केल्यानंतर किंवा पूर्व परीक्षा दिल्यानंतर ती संधी समजली जाणार आहे.

दरम्यान, याआधी एमपीएससी परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आपल्या वयाच्या मर्यादेपर्यंत तयारी करत होते. मात्र आता मर्यादा घालण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सीबीआय’नंतर राज्यात ‘ईडी’लाही ‘नो एंट्री’???; गृहमंत्र्याचं सूचक वक्तव्य

‘भारतीय हद्दीतील काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होत आहे’; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला

सायरस पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं- बाळा नांदगावकर

भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात!

“संजय राऊत यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या