बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! कोरोनाच्या घातक ठरलेल्या डेल्टा प्लस विषाणूचे या जिल्ह्यांत सापडले रूग्ण

मुंबई |  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हैदोस घातला होता. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. परंतू अशातच कोरोनाचा घातक ठरलेल्या डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

सापडलेल्या 21 रूग्णांमधील सर्वाधिक 9 रूग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात तर जळगाव 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या विषाणूच्या तपासणीसाठी जवळपास 7500 नमुने पाठवल्याची माहिती दिली.

महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला असून एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात येणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, 15 मे पासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचं स्क्विन्सिंग करण्यात आलं आहे. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत. या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे सापडलेल्या रूग्णांनी पुन्हा कोरोनाची लागण झाली का?, त्यांनी लसीकरण केलं होतं का?, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! ‘राज्यात 18 वर्षावरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस’; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

हृदयद्रावक! कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्यावर मुलानं अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार

दिलासादायक! महाराष्ट्रात आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होणार, राकेश टिकैत यांचं शेतकऱ्यांना आवाहन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More