बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लोकांनी गोमांस अधिक खायला हवं’; ‘या’ भाजप मंत्र्याचं वक्तव्य

शिलोंग | चिकन, मटण आणि माशांपेक्षा गोमांस जास्त खावं यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे, असं वक्तव्य मेघालयमधील भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुल्लई यांनी केलं आहे. एएनआयनं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

भाजप गोहत्येला प्रतिबंध करणारा पक्ष आहे असा गैरसमज अल्पसंख्यांकांच्या मनात आहे. तो यामुळे दूर होईल, असंही सनबोर शुल्लई यांनी म्हटलं आहे. सनबोर शुल्लई यांनी गेल्याच आठवड्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

भारत लोकशाही मानणारा देश आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ज्याला जे खायचं आहे, ती व्यक्ती ते खाऊ शकते. तसेच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच्याशी मी संवाद साधेन आणि आसामच्या नव्या गाय कायद्यामुळे गायींची वाहतूक प्रभावित होणार नाही याची काळजी घेईन, असं देखील त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, सध्या आसाम-मेघालय यांच्यातील सीमा प्रश्न पेटला आहे. या मुद्द्यावर देखील सनबोर शुल्लई यांनी प्रतिक्रिया दिली आहेआसामचे लोक सीमावर्ती भागांत आमच्या लोकांना त्रास देत असतील, तर आम्ही केवळ चर्चा करू शकत नाही. आम्हाला योग्य वेळा कारवाई करावीच लागेल, असं त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील”

मन सुन्न करणारी घटना; आजीच्या दशक्रिया विधीदिवशीच नातवांचाही मृत्यू!

“देशातील हर एक चौथा मुसलमान भिकारी आहे , ही माहिती अस्वस्थ करणारी”

“अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला”

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; झिका विषाणूचा पहिला रूग्ण आढळला ‘या’ शहरात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More