पुणे | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वडील मानकोजी शिंदे यांचा वारसा सांगणारे भाजपचे माजी आमदार प्रा. राम शिंदे यांच्याकडून मोठी चूक झाली आहे. मराठेशाहीतील मुत्सद्दी सेनापती मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना ही चूक झाली आहे.
आज मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने राम शिंदे यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरुन आज सकाळी सकाळी एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये मल्हारराव होळकरांना अभिवादन करण्यात आलं आहे, मात्र या पोस्टमध्ये वापरण्यात आलेला फोटो तुकोजीराव होळकर दुसरे यांचा आहे.
राम शिंदे यांनी अहमदनगरमधील कर्जत जामखेड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या भागात होळकर कुटुंबाला दैवतासमान मानणाऱ्या समाजाचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांच्या या चुकीचा त्यांना मोठा फटका बसू शकतो.
दरम्यान, राम शिंदे यांच्याकडून ही चूक झाल्यानं सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचा तसेच मानकोजी शिंदे पाटलांचा वारसा सांगणाऱ्यांना मल्हाररावांचा फोटो कळू नये?, असा प्रश्न विचारला जात आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“…तस आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”
“ब्राम्हण समाजाला दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता, माझ्या बोलण्याचा रोख संघाकडे होता”
महत्वाच्या बातम्या-
पिंपरी-चिंचवड भागातील आणखी एकाला ‘कोरोना’ची लागण!
खासगी ट्यूशनवाल्यांनो, क्लास बंद ठेवा अन्यथा कारवाईला सामोरं जा!
कोरोना संदर्भात पंतप्रधानाचा मोठा निर्णय; 1कोटी डॉलर्स इतका आपत्कालिन निधी
Comments are closed.