पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी शिनिवारी म्हणजेच आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काहीदिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठीची तयारी सुरु झाली असल्याचे सांगितले होते.
पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी लस निर्मित प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील कामाबाबत पाहणी करणार आहेत”.
अहमदाबादमधील जायडस कॅडिला पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये पंतप्रधान भेट देणार असून, ते तीन दिवसांच्या दौऱ्यांसाठी आहेत.
दरम्यान, 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत देखील सीरम इन्स्टिट्यूटला देऊन, तिथे सुरु असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर…- हसन मुश्रीफ
“मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरं मूल जन्माला घातलं नाही”
100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द!
“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”
“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही”