कुख्यात गुंड गजा मारणे विरोधात पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
पुणे | कुख्यात गुंड गजानन मारणेची नुकतीच तळोजा कारागृहातून खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी शेकडो गाड्या आणि हजारो समर्थक जमले होते व त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करून शेकडो गाड्यांनी एकही रूपया टोल भरला नाही.
टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत टोल चुकवल्याप्रकरणी आता खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली आहे. गुंडांच्या सुटकेवरून झालेल्या जल्लोषाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता.
2014 मधील पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांवर मोक्का लावण्यात आला होता आणि सगळ्यांना पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्या खटल्यातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याने मोठ्या धडाक्यात गजानन मारणेचं पुण्यात स्वागत करण्यात आलं आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन तसेच दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
गजा मारणेला काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली, पण त्यानंतर देखील गजा मारणेवर आणखी काही गुन्ह्यांप्रकरणी अटकेची टांगती तलवार होतीच, यापासूनच वाचण्यासाठी गजा मारणे सध्या फरार झाला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची स्वतंत्र पथके त्याचा शोध घेत आहेत.
थोडक्यात बातम्या-
संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…- उद्धव ठाकरे
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात तडीपार गुंडांची हातात तलवार घेऊन दहशत, पाहा व्हिडिओ
‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’; ‘या’ भाजप नेत्याची गंभीर टीका
“महाराष्ट्राचे इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही”
Comments are closed.