शेतकऱ्यांवर माओवादाचा ठपका, भाजप खासदार पूनम महाजनांनी मुक्ताफळं

मुंबई | आपल्या न्याय मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईपर्यंत चालत आलेल्या शेतकऱ्यांवर भाजपने आता माओवादाचा ठपका ठेवलाय. भाजप खासदार पूनम महाजन यांनी यासंदर्भात मुक्ताफळं उधळली आहेत. 

शेतकरी मोर्चात लाल झेडें दिसत आहेत. माओवादी पक्षाशी त्यांचा संबंध आहे. या शेतकरी मोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय का? असं पूनम महाजन म्हणाल्या आहेत. 

पूनम महाजन या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत तसेच भाजयुमोच्या अध्यक्ष आहेत, मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आता संताप व्यक्त केला जातोय.