Top News खेळ

“दुखापतग्रस्त मयांकची टीममध्ये निवड, मग रोहित शर्माची का नाही?”

नवी दिल्ली | बीसीसीआयकडून नुकतंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यामध्ये टीमचा अष्टपैलू खेळाडू रोहित शर्माचा समावेश केला गेला नाहीये. यावरून चाहत्यांमध्ये नाराजी होतीच. त्यातच आता माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा यानेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित शर्माला वगळण्याच्या निर्णयावर ओझाने प्रश्न उपस्थित केलेत. ओझा म्हणाला, “टीम इंडियाची झालेली निवड पाहून मी फार हैराण झालो आहे. मुख्य म्हणजे मयांक अग्रवालही हॅमस्ट्रिंगच्या समस्याने ग्रस्त आहे. मात्र त्याची संघांत निवड झालीये. तर मग रोहित का नाही?”

“शिवाय अचानक संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी लोकेश राहुलकडे देण्यात आलीये. आणि असातच जर रोहितचं टीममध्ये पुनरागमन झालं तर संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं,” अशी शंकाही त्याने व्यक्त केलीये.

रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान समावेश न केल्याने माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते. रोहित शर्माच्या दुखापतीची माहिती व्यवस्थितरित्या देण्यात यावी, असं मत गावस्कर यांनी व्यक्त केलंय.

महत्वाच्या बातम्या-

“आता यांच्या मुलांची लग्न देखील आपल्याच पैशातून होतील असं वाटतंय”

‘आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा’; रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक

‘जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला अन्यथा…’; मनसेनंतर शिवसेनेचाही आक्रमक पवित्रा

‘माझा मुलगा अवघ्या 15 मिनिटात झाला कोरोनामुक्त’; डोनाल्ट ट्रम्प यांचा अजब दावा

‘तुला थोबडवनार लवकरच, मुंबईत राहून कसं करिअर बनवतो तेच बघतो’; खोपकरांचा बिग बॉसमधील स्पर्धकाला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या