बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीला ‘आनंद पोटात मायेना’; शेअर केली खास पोस्ट!

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीबाबतची माहिती तिने एक पोस्ट करत दिली आहे. प्राजक्ताला मुख्यमंत्र्यांना भेटल्यामुळे खूप आनंद झाला आहे. प्राजक्ताने शेअर केेलेल्या पोस्टला एक खास शीर्षक दिलं आहे.

प्राजक्ताला मुख्यमंत्र्यांना भेटून इतका आनंद झाला आहे की तिला आनंद पोटात माझ्या मायेना, असं तिने आपल्या पोस्टच्या शीर्षकात म्हटलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधील सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या शोमध्ये प्राजक्ता सुत्रसंचालनाचं काम करते.सर्व टीम मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षावर गेली होती.

व्यस्त वेळापत्रकातून सबंध एक तास आम्हाला दिल्याबद्दल. मनापासून कौतुक करून उत्साह वाढवल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत प्राजक्ताने आभार मानले आहेत. प्राजक्ताची पोस्ट सोशल माध्यमांवर चर्चेत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली. तीही ‘वर्षा’ वर, असं सांगताना प्राजक्ताने आनंद पोटात माझ्या मायेना असा हॅशटॅगही दिला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

थोडक्यात बातम्या- 

देशात कोरोनाची तिसरी लाट???; या राज्यात गेल्या 10 दिवसांमध्ये रूग्णसंख्या 12,000 ने वाढली!

“आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं, तुम्हीही एकत्र येऊन पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”

नवनीत राणांना आवरला नाही कैऱ्या खाण्याचा मोह, पाहा नेमका काय किस्सा घडला!

सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ नव्या विषाणूचा होतोय शिरकाव

कौतुकास्पद! कोरोना संकटात ‘या’ शाळा मालकांनी 1000 विद्यार्थ्यांची वर्षभराची फी केली माफ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More