महाराष्ट्र मुंबई

“एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल”

मुंबई | भाजपमध्ये एकाधिकारशाही नाही आणि कधीच नव्हती. एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल, असा टोला भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे.

पूर्वी सामूहिक निर्णय घेतले जायचे आता केवळ देवेंद्र फडणवीस निर्णय घेतात आणि ते पक्षावर लादले जातात, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं होतं. यावर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपमध्ये एकाधिकारशाही नाही. हे खडसेंनाही माहीत आहे. त्यामुळे एकाधिकारशाही काय असते हे ज्या पक्षात जात आहेत. तिथे कळेलच, असं प्रसाद लाड म्हणालेत.

भाजपवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावं. एखाद्याची स्वप्न जर त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर त्याला कोणीच आळा घालू शकत नाही, असंही प्रसाद लाड म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

‘एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो’; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका

‘दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?’; अमृता फडणवीस आणि प्रियांका चर्तुर्वेदींमध्ये जुंपली

…तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते’; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

दिलासादायक! भारत बायोटेकची लस तिसऱ्या टप्प्यात, लवकच चाचणीला होणार सुरुवात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या